
महात्मा फुले चौक ते मार्केट यार्ड रस्त्यात खड्ड्यांबाबतच्या ग्राहक पंचायत च्या आंदोलनाला यश. शनिवारी खडीकरणाचे काम सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे आश्वासन.
अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने अकोले शहरानजीक महात्मा फुले चौक ते देवठाण रस्त्यावरील मार्केट यार्ड पर्यंतच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था व खड्डे यामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले होते. वारंवार संबंधित विभागाला निवेदने देऊनही कारवाई होत नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वी मनीषा पुंडे या मोटरसायकल वरून पडल्याने प्रचंड मार लागला, त्या सध्या नाशिक येथे दवाखान्यात उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 28 अपघात या रस्त्यांवर झाले मात्र याचे गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले नाही. गुरुवारी अकोले तालुका ग्राहक पंचायतने आंदोलनाचा इशारा दिल्याने संध्याकाळी थातूरमातूर माती मिश्रित मुरूम ठीक ठिकाणी टाकून काम केल्याचा कांगावा तयार केला. मात्र मूळ खड्डे तसेच असून ठीक ठिकाणी पाण्याचे डबके व खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत यामुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना, व्यापारी, पादचारी यांना येथून प्रवास करताना मोठ्या कष्टाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांचे निधी मंजूर आहे, काम करू असे आश्वासन दिले जात होते. मात्र ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची तीव्रता दोन तासात गतिमान झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले. मोठ्या प्रमाणात साधारण हजार ते बाराशे लोक, प्रवासी रास्ता रोको दरम्यान हजर होते. पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ झाली. मात्र दोन तास आंदोलनात आंदोलकांबरोबर प्रवासीही संयमाने आंदोलनात सहभागी झाले यामुळे आंदोलन तीव्र झाले.
यावेळी अकोल्याचे तहसीलदार माननीय सतीश राव थेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाधिकारी श्री महेंद्र वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता रास्ता रोको आंदोलन सुरू झाले ते साडेअकरा पर्यंत चालू होते, यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तालुक्यातील कामाचा दर्जा व गुणवत्ता नसल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा निधी फुकट वाया जात असल्याचे ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक व भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले. तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता महेंद्र वाकचौरे यांनी तालुक्यातील सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माधवराव तिटमे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला. यावेळी अरुण शेळके, महेश नवले, भाऊसाहेब वाकचौरे, रमेश राक्षे ,रामदास पांडे ,दीपक वैद्य, भाऊराव नवले, दत्ता ताजने, सुरेश नवले, दिलीप शंकर, एडवोकेट बाळासाहेब वैद्य, एडवोकेट दीपक शेटे, एडवोकेट राम भांगरे, ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांची आक्रमक भाषणे झाली. तसेच यावेळी दत्ता शेणकर, रामशेठ गुंजाळ, वैभव सावंत, किरण चौधरी, राम रुद्र, सुनील गीते, अनिल वैद्य, दत्ता बंदावणे, शिवाजी साबळे, रामदास सोनवणे सुधीन माने रमेश भांगरे श्रीकांत भुजबळ अनिल वैद्य भानुदास बांगरे सलमान शेख अनिकेत गीते शिवाजी गिऱ्हे, राम गुंजाळ, सुदाम भले, अमोल पवार, बाळासाहेब कासार, सुधीर कानवडे, दीपक मोरे आदिंसह प्रवासीही उपस्थित होते.
.
संपादक
प्रशांत देशमुख,डेली न्यूज
Nice blog