
वृक्षारोपणासाठी विशेष निमंत्रित पाहुणे होते अकोले तालुका पत्रकार संघ व पत्रकार
नगर : अकोले तालुक्यातील गर्दनी परिसरातील रेणुका आई मंदिर लगतच्या डोंगरावर विविध फळांच्या जातीची, फुलांची व स्थानिक वृक्षांच्या रोपांची लागवड, वृक्षारोपण करण्यात आले. वनविभाग अकोले यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वृक्षारोपणासाठी विशेष निमंत्रित पाहुणे होते अकोले तालुका पत्रकार संघ व पत्रकार.
यावेळी अकोले तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांच्या हस्ते व वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रोप लावण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने खड्डे घेण्यात आले होते तसेच रोप लावल्यानंतर त्याची निगा राखण्याची जबाबदारी स्थानिक वनव्यवस्थापन समिती व वनविभाग यांनी घेतली.
याप्रसंगी पत्रकार हेमंत आवारी यांनी वनविभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच रोपांची निगा राखल्यास भविष्यात इथे वनपर्यटन होईल असा आशावाद व्यक्त केला तसेच अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर यांनी साडेसहाशे हेक्टर परिसर असून जवळच धबधबाही आहे , रोपांची वाढ झाल्यास येत्या तीन-चार वर्षात पर्यटक मोठ्या संख्येने या परिसराला भेट देतील असे सांगून वनविभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना सदिच्छा दिल्या.
यावेळी वनक्षेत्रपाल प्रदीप कदम, वनविभागाचे कर्मचारी तसेच अकोले तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार, अध्यक्ष विजय पोखरकर, हेमंत आवारी, सचिव अल्ताफ शेख, प्रशांत देशमुख, गणेश आवारी, अमोल शिर्के, सातपुते सर आदींसह संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते
संपादक
प्रशांत देशमुख,
डेली न्यूज, अकोले