आज इंटरनेटच्या माध्यमातुन अनेक व्यावसाईक आपला व्यवसाय ऑनलाईन करत
आहे. आज शिक्षण कितीही असले तरी ज्याला ऑनलाईन काम जमत नाही तो अडाणी, असा समज
नविन पिढीत प्रचलीत आहे. काही अंशी असा समज होणे स्वाभाविक आहे कारण एकट्या भारतात
जवळपास 97 % लोकसंख्या स्मार्टफोन युजर आहे. त्यातील काहींकडे दोनपेक्षा जास्त
स्मार्टफोन आहे.

जग सतत अपडेट होत आहे, जर मागे पडायचे नसेल तर आपणही अपडेट राहीले
पाहीजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर बिझनेस करणे काळाची गरज आहे. आजच्या या आर्टीकल मधे
आपण ऑनलाईन बिझनेस कसा करावा हे बघणार आहोत.
काळाची गरज ओळखुन अनेक विदेशी कंपण्यांनी व्यावसाईकांना ऑनलाईन
प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे, आकर्षक पॅकेजेस देवुन त्या आकर्षक कमिशन
व्यावसाईकांकडुन वसुल करतात, आणी बर्याचदा आपल्या भारतीय व्यावसाईकांचा नफाच या
परदेशी कंपण्या खावुन टाकतात. म्हणुन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर बिझनेस करताना आपण
ऑनलाईन सर्विस देणारी कंपणी निवडताना काही सावधानता बाळगणे गरजेचे आहे…

- भारतीय
बाजारपेठ व भारतीय व्यावसाईकाच्या गरजा माहीत असल्याने ऑनलाईन सर्विस प्रोवाईडर
कंपणी भारतीयच निवडा. - विदेशी
कंपण्या टाळा, कारण त्या कंपण्या तुमचा बिझनेस सेट करायला नाही, तर त्यांचा धंदा
सेट करण्यासाठीच भारतात आल्या आहेत. मोठ-मोठे बॅनर, तुम्हाला भुरळ घालण्यासाठी
जाहिरातिंवर केलेला करोडोंचा खर्च त्या तुमच्याकडुनच वसुल करतात. म्हणुन कितीही
आकर्षक वाटल्या तरी परदेशी कंपण्यांपासुन लांब रहा. - फ्रि
रजिस्ट्रेशन देणार्या कंपण्यांकडे बघुही नका. व्यावसाईक फिल्ड मधे फ्रि ची अपेक्षा
ठेवु नका, फ्रि के आगे क्या है, हे कळेपर्यंत उशिर झालेला असेल. - फ्रि
रजिस्ट्रेशन देवुन प्रॉडक्टमागे ठराविक कमिशन घेणार्या काही कंपण्या आहेत, पण हे
असे कमिशन देणे परदेशात परवडते, भारतीय व्यावसाईकांच्या द्रुष्टिने ते परवडणारे
नाही. कमिशन घेवुन प्रॉडक्ट सेल करणार्या ऑनलाईन सर्विस देणार्या कंपण्या तुमचा
नफा संपवतील, त्यांना प्रेमाणे बाय करा व आपला नफा वाचवा. - काही
परदेशी कंपण्या तुम्हाला फ्रि ऑफर देवुन तुमचे प्रॉडक्ट खरेदी करुन (रोख
नाही,प्रॉडक्ट सेल करुन त्याचा नफा काढुन, मग उरलेले पैसे तुम्हाला) त्यांच्या
किमतीत ते सेल करतात. ते ही तुमच्या जिवावर स्वताच मोठे होतात, तुम्ही कितीही
मेहनत घेतली असेल तरी तुम्ही या प्रोसेसमधे मागेच राहता, हा पर्याय म्हणजे सफेद
हत्ती पोसण्यासारखाच आहे. त्या मार्गाने जाणे टाळलेच पाहिजे. - स्वतःची
वेबसाईट बनविण्याचा पर्याय आहे, परंतु सध्या भारतात स्वस्तात वेबसाईट बनवुन
देणार्यांचा सुळसुळाट झालाय, अशा स्वस्तातल्या वेबसाईट फक्त बनवुन देणार्याचे खिसे
भरत असतात, व अपडेट च्या नावाखाली चार पाच वर्ष तुमच्याकडुन वेगवेगळे चार्जेस
घेतात व नंतर एवढ्या कमी किंमतीत एवढेच फिचर येतात म्हणुन तुमचीच लायकी काढतात.
प्रलोभनाचा व स्वस्त लोकांचा नाद सोडा. - भारतीय
व्यावसाईकांसाठी बिझनेस ऑनलाईन नेण्याचा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे, कोणतीही भारतीय
ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपणी. मग ती स्टार्ट अप असेल तरी चालेल, कारण त्यांचा
तुमच्या व्यावसायिक गरजांचा तसेच तुमच्या व्यवसायासाठी लागणार्या मार्केट चा
अभ्यास असतो. परंतु फ्रि रजिस्ट्रेशन व प्रॉडक्ट मागे कमिशन घेणारी नको, त्यांना
सांगा वार्षिक फी घ्या, कमिशन नाही. आम्ही वर्षभरात कितीही प्रॉडक्ट सेल करु,
त्यात कमिशन देणार नाही. तुमचे सर्विसचे
वार्षिक फी तेवढी देवु, ही पद्धत भारतीय व्यावसाईकांच्या दृष्टिने फायदेशिर आहे.

चला तर मग वरील
बाबिंवर काळजीपुर्वक विचार करा व आपला व्यवसाय डिजिटल तसेच काळानुसार ऑनलाईन सुरु
करा, काही मदत लागल्यास नक्की संपर्क करा. पुढील आर्टिकल मधे आपण कमिशन न घेता
वार्षिक पॅकेज देणारी ऑनलाईन सर्विस प्रोवायडर भारतीय कंपणी f2hservices.com या विषयी
व how to create store
(online) विषयी जाणुन घेणार आहोत.
लेख आवडल्यास नक्की
शेयर करा. धन्यवाद.
related article