Editor choice

यशस्वि अभिनेत्री क्रांती रेडकरचा स्वानुभव

मित्रांनो, क्रांती रेडकर माहित आहे का? दुरदर्शन,रंगमंच,मराठी चित्रपटातील त्यांच्या भुमिका प्रसिद्ध आहे.

    त्यांनी गंगाजल,फुल 3 धमाल,लाडी गोडी,ऑन ड्युटी 24 तास,नो एंट्री पुढे धोका आहे,पिपाणी,खो-खो,काकण,युद्ध,मर्डर मेस्त्री, करार,शहाणपण देगा देवा,माझा नवरा तुझी बायको,शिक्षणाच्या आईचा घो, जत्रा(कोंबडी पळाली,तंगडी धरुन…आठवतंय गाणं),अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांमधुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले,अजुनही करताय. त्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत.

    आज ईथे आपण त्याच्या जिवनातुन, त्यांच्या स्वः अनुभवातुन आपल्याला काही संदेश मिळतो का? प्रेरणा मिळते का? हे बघणार आहोत.

    कलर मराठी या चॅनलवर दर्शन हा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमातुन सुपरिचीत प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आपल्यासोबत परमेश्वरी शक्तीची प्रचिती आलेल्या लोकांचा अनुभव शेयर करतात. 24 फेब्रुवारी च्या एपिसोड मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तारका क्रांती रेडकर या अभिनेत्री होत्या, त्यावेळी स्वतःचा अनुभव त्यांनी सर्वांसाठी शेयर केला.

क्रांती रेडकर म्हणाल्या, “ मि एकदा माझ्या कारमधुन जात असताना, कार सिग्नलवर थांबली होती,सिग्नल रेड होता, तिथे काही लहान मोठी मुले भिक्षा मागत होती. मला वाटले मि तिला खायला काहीतरी दिले पाहीजे, म्हणुन मि काही चॉकलेट्स हातात घेतली, जवळच एक मुलगी होती, ते चॉकलेट्स मि तीला द्यायची खुप ईच्छा होती. मि तीला हात करुन बोलाविले, सिग्नल रेड असल्याने सर्व घाईतच होत होते. मि मझ्या कारची उजव्या बाजुची काच खाली घेतली. पण घाई-घाईत ति मुलगी डाव्या बाजुने आली. दोघींनी एकमेकींकडे बघीतले, ती डाविकडे गेल्याने मि कार विंडोची डावी काच खाली करुन त्या दिशेला सरकले तर ती उजव्या बाजुने यायला लागली. अगदी काही सेकंदात हे सर्व घडत होते. पण ती या बाजुने येईपर्यंत सिग्नल ग्रिन झाला आणी आमची कार मार्गस्थ झाली.

    क्राती पुढे म्हणाल्या तिला घ्यायचे होते, मलाही द्यायचे होते. ती आधी आली त्याच खिडकी जवळ थांबली असती तर माझे देणे आणी तिचे घेणे पुर्ण झाले असते.

    त्यांच्या या स्वः अनुभवातुन त्यांनी आपल्यासही काही दिले आहे फक्त आपल्याला ते घेता आले पाहीजे. आपल्याला मिळाला एक संदेश, एक प्रेरणा….की जर तुम्ही व्यवसाय करत असाल, किंवा कोणतेही महत्वाचे काम करत असाल आणी त्यात काही अडचणी आल्यास अधीर होवु नका. विश्वास ठेवा. आणी शांततेने, संयमाने परिस्थितीस सामोरे जा. एका जागी टिकुन रहा…. तो नक्की देतो, नव्हे त्याला ते आपल्याला द्यायचेच असते.

आपणास हा लेख कसा वाटला, याबाबत नक्किच खाली “Leave Reply” मधे लिहा. तुम्ही हे लेख “f2hservices.com” या आमच्या वेबसाईट वर व “F2H-farm to home” या आमच्या अँप वर जावुन मेनुमध्ये (≡) Blog पुन्हा नक्की बघा.

आपलाच

प्रशांत देशमुख ( लेखक F2H SERVICES मध्ये CEO आहेत.)

[arrow_forms id='2083']
We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Logo
Register New Account
Reset Password
Compare items
  • Total (0)
Compare
0