User choice

नविन व्यवसायाची सुरवात कधी करु? जाणुन घ्या.

आज तंत्रज्ञानाच्या युगात स्वप्नांना खुपसारे रंग मिळालेत. डिजिटल वर्ल्ड ची चमक रोज नवनविन स्वप्नांचा बाजार भरविते. आपणही स्वार होतो त्या स्वप्नांच्या अश्वावर. आपल्या अवती भोवती रोज आपले मित्र, नातेवाईक वा आपण स्वतःही नेहमी म्हणताना ऐकतो… .यार एक दिवस मला ही काहीतरी बिझनेस सुरु करायचाय. चला तर मग या मोटिवेशनल लेखात नविन व्यवसायाची सुरवात कधी करायची त्याची प्रेरणा घेउ.

“ If you can Dream it, You can do it. “

कशाला उद्याची बात : नविन व्यवसाय सुरु करायचाय, पण डिटेल्स माहीत नाही. कस्टमर मिळतील का, मला जमेल का?   आज तर लगेच शक्यच नाही, कधीतरी बघु. मित्रों कधीतरी कधीच येत नाही. जे करायचे ते आजच, व्यवसायाची डिटेल्स आजच मिळवायचे, प्लॅनिंग आजच, सुरुवात आज – आताच करा.

विचार थांबवा : आता पर्यंत केला तेवढा विचार खुप झाला. आता कृती करण्याची वेळ आहे. व्यवसायाच्या परिणामांची भिती सोडुन द्या. नैराश्य, वेळकाढुपणा,आळस झटकुन टाका. आजपासुनच आव्हानांना सामोरे जा. आपल्या स्वप्नांच्या दिशेने रोज एक एक पाउल टाका. सुरुवात करण्याचा एकच मार्ग.. काम चालु – चर्चा बंद.

“ The way to get started is to quit talking and begin doing. “

आता तडजोड नाही : रुटीन ठरवुन घ्या. तुम्हाला ज्यात यश मिळवायचे आहे,त्यावर लक्ष द्या. निश्चित ध्येयाकडे वाटचाल सुरु करा. नक्कीच जमेल. नाहीच जमले तरी विचलीत होवु नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. सुरु केलेला उद्योग सुरुच ठेवा. आता कशाशिही तडजोड करु नका.

तंत्रज्ञान आत्मसात करा : उद्योजकतेकडे वाटचाल सुरु केलीय तर सतत अपडेट राहीले पाहीजे. नवनविन तंत्रज्ञान शिका. उद्या नाही, आजच कारण उद्या कधी उगवत नाही. नविन असल्याने काही चुका होतील,निरिक्षण करा. त्या चुकांमधुनही तुमचा बिझनेस तुम्हाला उद्योगातले बारकावे शिकवत असतो.

“ When mistakes, just OBSERVE; Your business is trying to teach you something.”

  • सातत्य ठेवा :  या मोटिवेशनल ब्लॉग मधे आपण काही प्रेरणादायी टिप्स आत्मसात केल्या. व्यवसाय सुरु करायचाय तर कशाला उद्याची बात, करा आजच सुरवात. तुमची वाटचाल अखंड चालु ठेवा. सातत्य ठेवा. चला तर मग यशस्वि उद्योकतेकडे पहिले पाउल टाकुया, समृद्ध बनुया.

Keep Going – Everything you need will come to you at the perfect time.”

आपणास हा लेख कसा वाटला, याबाबत नक्किच खाली “Leave a Reply” मधे लिहा. तुम्ही हे लेख “f2hservices.com” या आमच्या वेबसाईट वर व “F2H-farm to home” या आमच्या अँप वर जावुन मेनुमध्ये (≡) Blog पुन्हा नक्की बघा.

प्रशांत संपतराव देशमुख.

(लेखक फार्म टु होम सर्विसेसमध्ये सि.ई.ओ.आहेत.)

[arrow_forms id='2083']
We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Logo
Register New Account
Reset Password
Compare items
  • Total (0)
Compare
0