
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सक्सेसफुल ( यशस्वी ) व्हायचे असते. आपली जिवनाबद्दल, सक्सेस बद्दल, काही ना काही स्वप्न असतात. ज्यांची सर्व स्वप्न पुर्ण होतात, अशी 1 टक्के लोकं ह्या जगात आहे. बरीचशी स्वप्न पुर्ण होणार्यांची संख्याही खुप मोठी आहे. पण सर्वांचीच स्वप्न पुर्ण होत नाहीत, ही देखिल वास्तविकता आहे. अशावेळी आपण नशिबास दोष देवुन मोकळे होतो किंवा दुसर्या यशस्वी व्यक्तींना दोष लावुन स्वताचे समाधान करण्याचा असफल प्रयत्न करतो, जसे त्याचे काय फॅमिली बॅकग्राऊंड चांगले होते, त्याला घरचा सपोर्ट आहे, माझे तसे नाही, मला सर्वच बघावे लागते… वगैरे वगैरे.
पण आपण आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी, यशस्वि उद्योजक होण्यासाठी मेहनत किती घेतो, कशी घेतो याकडे संपुर्ण दुर्लक्ष करतो.
Winners don’t make excuses when the other side plays the game.
चला तर मग बघुया यशस्वी उद्योजकांमध्ये असलेले सर्वसाधारण गुण. हे गुण ज्याला अंगी बाणविता आले, त्याला यशस्वी उद्योजकच काय, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यापासुन कोणीही रोखु शकत नाही.
- एकाग्रताः

आपल्या व्यवसायात, करत असलेल्या कामात, आपली एकाग्रता असणे गरजेचे आहे. एकाग्रता वाढविता येते. सातत्यपुर्ण सरावाने शारीरिक व मानसिक विकास करत इच्छाशक्ती चा योग्य वापर करुन एकाग्रता जोपासता येते. उद्योग-व्यवसाय यशस्वितेकडे मार्गक्रमण करत असताना अनेक अडचणी येत असतात, नव नविन आव्हानांचा सामना करावा लागतो. संकटे ,,आ,, वासुन उभी राहतात, क्षणिक मोह, प्रलोभने तुमचे लक्ष विचलित करतात. हितशत्रु गोड बोलुन डि-मोटिवेट करतात, प्रतिस्पर्धि व्यवसायातुन मिळणारया फायद्यांपेक्षा संभाव्य तोट्यांचा, आर्थिक नुकसानीचा पाढाच तुमच्यासमोर वाचतिल. हे एका ठराविक पॅटर्नप्रमाणे सतत होत असते, अशावेळी उपयोगी पडते ती एकाग्रता. काहीही झाले तरी आपली आपल्या व्यवसायावरची, कामावरची, आपल्या स्वप्नांवरची निष्ठा कमी होता कामा नये. म्हणुनच यशस्वि उद्योजकांची एकाग्रता अढळ व अटळ असते.
Concentration can be cultivated,One can learn to exercise will power, discipline One’s body and train One’s mind.
- इच्छाशक्ती (यशस्वि होण्याची)-

,,ईच्छा तेथे मार्ग,, , जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी तुमची तशी प्रामाणिक ईच्छा पाहिजे. आणि जर यशस्वी उद्योदक व्हायचे असेल फक्त ईच्छा असुन चालणार नाही, तर (ईच्छा±शक्ती ईच्छाशक्ती) प्रबळ ईच्छाशक्ती पाहीजे. उदाहरणार्थ टाटा,बिरला,अंबानी,किर्लोस्कर,बच्चन,तेंडुलकर ही लोकं आपल्याला माहीती आहे. नव्हे तर ती त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत हेही आपणास ठाउक आहेत. पण या कर्तुत्ववान व्यक्तींमधे काही समानता आहे, त्या कदाचित तुम्हाला माहित नसतिल.
मित्रांनो सर्व यशस्वी उद्योजकांमधे एक अशी शक्ती आहे जी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनविते, स्पेशल बनविते. जी हरण्याला सुद्धा जिंकण्यात बदलविते, तुमची सर्व स्वप्न सत्यात साकार करु शकते. ही शक्ती सगळ्यांकडे असते… गरज आहे ती वापरण्याची. त्या शक्तिचे नाव आहे… Will Power… ईच्छाशक्ती.
ईच्छाशक्ती एक कला आहे, कौशल्य आहे. ईच्छाशक्ती असे काहीतरी नाही जे थोड्या लोकांकडे आहे आणी ईतरांकडे नाही. हे असे कौशल्य आहे जे नियमित सरावाने विकसित करता येते. ज्या व्यक्तिकडे जेवढी जास्त ईच्छाशक्ती तितकाच जास्त तो यशस्वी.
Willpower isn’t something that gets handed out to some and not to others. It is a skill you can develop through understanding and practice.
- वाचनः

बर्याच जणांचे वाचन तेव्हाच सुटते जेव्हा ते शाळा,कॉलेज मधुन पदवी घेवुन बाहेर पडतात. यशस्वी उद्योजक असे करत नाही. कारण वाचनाने मानसिक उत्तेजन मिळते. रोजच्या धावपळीतले ताण-तणाव कमी होतात. शब्दसंग्रह वाढतो, स्मरणशक्ती चांगली होते, मजबुत विश्लेषणात्मक विचार कौशल्ये प्राप्त होतात, एकाग्रता सुधारते.
यशस्वी उद्योजक आपल्या व्यवसायाबद्दल, कामाबद्दल नव-नविन येणारया पुस्तकांचे वाचन करतात. स्वतःसह सहकार्याना नेहमी अपडेट ठेवतात. चांगली पुस्तके संग्रहीत ठेवतात. यशस्वी होण्याची एक पायरी म्हणजे दर्जेदार वाचन.
A Reader lives thousand lives before he dies.
- मेहनतः

घामाच्या शाईने ज्यांनी स्वप्न लिहीली, त्यांची नशिबाची पाटी कधीच कोरी होत नाही. लक्षात ठेवा कालची एकाग्रता, ईच्छाशक्ती आणि वाचन… आज उपयोगी येणार, आणि आजची मेहनत उद्या यशस्वी बनविणार. जी लोकं मेहनत घ्यायला घाबरतात, ती नेहमिच दुसरयांच्या अधिन राहतात. स्वतःला मेहनतीची सवय लावुन घ्या. जी स्वप्न तुम्ही पाहीलित ती पुर्ण होइपर्यंत मेहनत करा.
A Dream dosen’t become reality through magic; It takes sweat determination and Hard Work.
- विक्री व विपणनः

।। यशस्वितेचा मुलमंत्र ।। यशस्वी उद्योजक आपल्या कौशल्याचे, उत्पादनाचे योग्य रितीने मार्केटिंग करण्याचे कौशल्य आत्मसात करतात. जिथे पिकते तिथेच विकण्याचा शहाजुकपणा ते कधिच करत नाही ,, जिथे कमी…तिथे आम्ही,, या उक्तिप्रमाणे आपल्या उत्पादनाला किंवा कौशल्याला कुठे मागणी जास्त आहे, त्याचा शोध घेतात. योग्य ठिकाणी, योग्य मार्केटिंग केल्यास विक्री निश्चीत होते व उद्योग यशस्वी होतो.
The no.1 Key to success in today’s sales environment is speed. The sales person who delivers the most valuable information to their customer or prospect first; Wins the Game.
- आर्थिक नियोजनः

योग्य तिथे काटकसर केली पाहीजे पण विनाकारण काटकसर करत असाल तर सावध व्हा. जिथे गरज असेल तिथे खर्च झालाच पाहीजे. गुंतवणुक केल्यानेच पैसा वाढतो. त्यामुळे सर्व परिस्थितीचा अंदाज घेवुन भांडवल उभे करा व आपल्या व्यावसायिक गरजेनुसार गुंतवणुक करत चला. गुंतवणुक ही एक कला आहे. आपले त्याविषयी असलेले अज्ञान, अनुभव नसल्याने निर्माण झालेली भिती व संयमाचा अभाव या काही प्रमुख कारणांमुळे आपण गुंतवणुक करण्यास घाबरतो. पण यशस्वी व्हायचे असेल तर उद्योगात व त्या अनुषंगाने गुंतवणुक वाढविली पाहीजे.
ईतर लोक यशस्वी झालेत, हे आपणास दिसते, त्यामागे त्यांनी जोपासलेली एकाग्रता, प्रबळ ईच्छाशक्ती, दर्जेदार वाचन, प्रचंड मेहनत, सेल्स व मार्केटिंग कौशल्य आणि सर्वात महत्वाचे अचुक आर्थिक नियोजन करुन योग्य वेळी केलेली गुंतवणुक हेच प्रमुख गुण आहेत.
To achieve what 1% of the worlds population has(financial Freedom), You must be willing to do what only 1% dare to do…… Hard work and perserverance of highest order.
आपणास हा लेख कसा वाटला, याबाबत नक्किच कमेंट मध्ये लिहा. तुम्ही हे लेख f2hservices.com या आमच्या वेबसाईट वर व F2H-farm to home या आमच्या अँप वर जावुन मेनुमध्ये (≡) Blog बघु शकतात.
जोपासलेली एकाग्रता, प्रबळ ईच्छाशक्ती, दर्जेदार वाचन, प्रचंड मेहनत, सेल्स व मार्केटिंग कौशल्य आणि सर्वात महत्वाचे अचुक आर्थिक नियोजन करुन योग्य वेळी केलेली गुंतवणुक हेच प्रमुख गुण जर तुमच्याकडे नसतिल तरीही परिस्थितीला वा नशिबाला दोष देत न बसता आजच आत्मसात करा, कसे आत्मसात करावे हे समजत नसेल तर लेख पुन्हा वाचा. उत्तर नक्किच मिळेल. आणि हे सर्व गुण जर तुमच्याकडे असतिल तर वाचत काय बसलाय, आतापासुनच सुरुवात करा…. तुम्ही नक्किच यशस्वी व्हाल.
।। यशस्वि भवः ।।
प्रशांत संपतराव देशमुख.
(लेखक फार्म टु होम सर्विसेसमध्ये सि.ई.ओ.आहेत.)