
मित्रांनो बर्याच दिवसांपासुन ब्लॉग लिहीण्याचा विचार करत
होतो, आणि पहिलाच लेख महाराजांवर, म्हणजे दुग्ध-शर्करा योगच…असो..
निवृत्ती महाराज देशमुख, हे नाव माहित नाही असा माणुस, महाराष्ट्रातलाच नाही, असे विधान वावगे ठरणार नाही. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती महाराजांनी एका प्रवचनात केलेल्या विधानाची. पण तत्पुर्वी महाराजांविषयी थोडेसे. नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख, स्वतः B.sc. B.Ed. आहे. अनाथ व निराधार मुला-मुलींसाठी त्यांनी शाळा सुरु केली आहे. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील 5 वी ते 10 वी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणीक खर्च समवेत गो शाळा हि चालवतात. भाकड गायींची गो शाळा हि आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ताह महाराज स्वखर्चांने करतात, तसेच पंचक्रोशीतील मंदिरांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चाने देतात. शाळेमध्ये ११ कम्प्युटर आहे. शाळा संपूर्ण डिजिटल आहे.. इथे चाचणीची फी नाही, दाखल्याची फी नाही किंवा परीक्षा फी सुध्दा नाही. महाराज म्हणतात कि मी असो-नसो या शाळेवर तुमचे प्रेम राहू द्या. या शाळेतील ४ मुले सध्या पोलीस मध्ये आहे. एक विद्यार्थी एमपीएससी पास होऊन अधिकारी झाला आहे. कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील, इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज, इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याचे हेच कारण आहे. असो त्यांचे कार्य एका लेखात मांडता येणार नाही,असे कर्मनिष्ठ प्रबोधनकार. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे जिवनच समाज व अध्यात्माला समर्पित आहे. त्यांचा अध्यात्माचा, शास्त्रांचा दांडगा अभ्यास आहे. धार्मिक ग्रंथांत सांगितलेले विचार सामान्य लोकांना समजेल, अशा शब्दांत सांगतात. मुळात हल्ली सर्वांचेच सकस व दर्जेदार वाचन कमि नव्हे तर काहीच नसल्याने, अज्ञानी लोकांना फक्त विनोद दिसतो, त्यातला मतितार्थ कळतच नाही. तर ज्ञानी लोकांसाठी आजच्या काळातही वेद,ऋग्वेद,उपनिषदे,गुरुचरीत्र,गिता ह्यांमधे सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात. त्यामधे मनुष्याच्या जन्मापासुन ते मृत्युपर्यंत, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जिवन कसे जगावे,आचरण कसे असावे,अगदी जेवताना कसे बसावे ईथपासुन ते कसे बोलावे,चालावे,झोपावे,वागावे,काय करावे-करु नये, अशा अनेक आपल्या दैनंदिन अतिशय लहान सहान गोष्टीही समजावुन सांगितल्या आहेत. जो वाचेल त्यालाच कळेल, व ज्याला कळेल तोच खर्या अर्थाने जिवन… जगेल… बाकी जन्माला आला हेला-पाणी भरता भरता …
हाच अध्याय ईंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा विषय होता. नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले?
‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगाहोतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.
संपुर्ण अध्याय :
रजस्वला न होता स्त्रियेसी । न करावा संग परियेसी । संग करिता महादोषी । आणिक प्रकार एक असे ॥४९॥
दश वर्षे होता कन्येसी । रजस्वला सर्वत्रांसी । ऐका तुम्ही सर्व ऋषि पराशर सांगतसे॥२५०॥
ऋतुकाळ असता स्त्रियेसी । गावासी जाता परियेसी । भ्रूणहत्या होय दोषी । प्रख्यात असे परियेसा ॥५१॥
वृद्ध अथवा वांझेसी ।असती पुत्र जिसी । बहु कन्या होती जियेसी । चुकता ऋतुकाळ दोष नाही॥५२॥
ऋतु देता चतुर्थ दिवसी । पुत्र उपजे अल्पायुषी । कन्या होय पाचवे दिवसी । सहावे दिनी पुत्र परियेसा ॥५३॥
विषम दिवसी कन्या जाण । सम दिवसी पुत्र सगुण । दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावे ॥५४॥
मूळ मघा रेवती दिवसी । संग न करावा परियेसी । कोप नसावा उभयतांसी । संतोषरूपे असावे ॥५५॥
ऋतुकाळी स्त्रीपुरुषांसी । जे जे असेल मानसी । सत्त्वरजतमोगुणेसी । तैसा पिंड उपजे देखा ॥५६॥
ऐसा ब्राह्मणाचा आचार । सांगता झाला पराशर । ऐकोनि समस्त ऋषीश्वर । येणेपरी आचरती ॥५७॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । ऐसा आचार परियेसी । जे आचरती विधींसी । दैन्य कैचे तया घरी॥५८॥
ते वंद्य होत देवांसी । कामधेनु येईल घरासी । लक्ष्मी राहे अखंडेसी । पुत्रपौत्री नांदती ॥५९॥
होय आपण शतायुषी । न घडती दोष काही त्यासी । तो न भिई कळिकाळासी । ब्रह्मज्ञानी होय जाणा ॥२६०॥
काळमृत्यु चुके देखा । अपमृत्यु घडे कैचा ऐका । ऐसा आचार आहे निका । नित्य रहाटावे येणेपरी ॥६१॥
ऐसे ऐकोनिया वचना । विप्र लागे श्रीगुरुचरणा । झाला उपदेश उद्धारणा । कृपासागर गुरुमूर्ति ॥६२॥
भक्तजन तारावयासी । अवतरलासी ह्रषीकेशी । परिहरिले अंधकारासी । ज्ञानज्योती प्रकाशली ॥६३॥
ऐसे विनवोनि ब्राह्मण । पुनरपि धरिले श्रीगुरुचरण । श्रीगुरुमुर्ति संतोषोन । प्रसन्न झाले तये वेळी ॥६४॥
म्हणती श्रीगुरु तयासी । आचार सांगितला तुज हर्षी । नव जावे आता भिक्षेसी । आचार करूनि सुखी असे ॥६५॥
जे जे इच्छिसी कामना । होईल निरुती सत्य जाणा । कन्या पुत्र नांदती सगुणा । संदेह न धरावा मानसी ॥६६॥
ऐसा वर लाधोनि । विप्र गेला संतोषोनि । होता तैसा आचरोनि । सकळाभीष्टे लाधला ॥६७॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसे परियेसी । ऐकता ज्ञान समस्तांसी । मूढ होय ब्रह्मज्ञानी ॥६८॥
अज्ञानतिमिरअंधकारासी । ज्योतिप्रकाश कथा सुरसी । जे जे इच्छिले मानसी । पाविजे त्वरित अवधारा ॥६९॥
म्हणे सरस्वतीगंगाधरु । श्रीगुरुचरित्र असे सुरतरु । ऐकता होय संतोष फारु । सकळाभीष्टे साधती ॥२७०॥
इति श्रीगुरुचरित्र । नामधारका शिष्य सांगत । आचार जो का समस्त । निरोपिला श्रीगुरुनाथे ॥२७१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
आह्निककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥
अर्थात :
आपल्या गुरुचरित्रात कर्मकांड स्पष्ट करण्यासाठी असलेल्या 37व्या अध्यायात पराशर ऋषींनी कर्मांचे स्पष्टीकरण व तपशीलवार वर्णन केले आहे. प्रार्थना कक्ष स्वच्छ व रांगोळीने सजवावे. शांततेत ध्यान करा आणि देवाची उपासना करा. लाकडी व दगडी मूर्तींची पूजा केली जाऊ शकते, कारण त्यांचे रूप व निवासस्थान आहेत. देव, एका चांगल्या, स्वच्छ आसनावर बसवा आणि प्राणायाम करा, तुळशीची आवड असल्याने विष्णूची पूजा तुळशीने करावी आणि विश्वासाने बेल-पात्राने शिवची पूजा करावी.गणपतींना दुर्वा आवडतात. भोजनानंतर आपण वेदांचा अभ्यास करावा एखाद्या स्मशानभूमीवर, नदीच्या काठावर, मुंग्यांच्या वारुळाजवळ किंवा क्रॉसरोडजवळ, एखाद्या जीर्ण झालेल्या मंदिरात, झोपू नये असे प्रथा आणि धर्म ठेवले आहेत. ज्याला या रीतिरिवाजांचे निर्देश आहेत त्यानुसार पाळण्यास कोणतीही अडचण नाही. शास्त्रानुसार. तो देवतांनीही पूजनीय आहे. कामधेनु त्याच्या घरी येईल. लक्ष्मी अशा घरात सदैव राहतील. अशी व्यक्ती ब्रह्मज्ञानी होईल. ” ब्राह्मण, धर्मावर हे मार्गदर्शन मिळवून खूष झाला आणि म्हणाला, “अरे, दयेचा सागर, तू हा अवतार भक्तांना सोडविण्यासाठी घेतलेला आहेस. तू ज्ञानाच्या दिव्यासारखे आहेस आणि तू अंधार दूर केला आहे.” असे म्हणत ब्राह्मण.. श्रीगुरूंच्या कमळाच्या चरणी टेकला. गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला. ही गुरु चरित्रांची कहाणी आहे. जो कोणी हे ऐकेल त्याला मोठे ज्ञान मिळेल. हे अज्ञानी लोकांसाठी प्रकाशाचे स्रोत आहे.
असा आहे,त्यात अनेक रीतीरिवाज सांगितले आहे आणि हाच अध्याय ईंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा विषय होता. महाराजांविषयी आदर व आपुलकी असणार्या सर्वांनाच किर्तनाचा विषयावर वाद होणे अपेक्षीत नव्हते, असो कालाय तस्मैः नमः….
पण धर्म आणि कायदा एकमेकांच्या विरोधात उभे न राहता, समांतर सोबत चालले तरच समाज व्यवस्था सुरळीत राहील. अन्यथा संघर्ष अटळ.
Blog कसा वाटला नक्की सांगा.
आपलाच
प्रशांत संपतराव देशमुख.
“ इंदुरीकर महाराज देशमुख “ नाम तो सुनाही होगा…..
Your First Blog Attempt. It’s Amezing !!!!
Thank You For Appreciation
Ram Krishna Hari
Very nice, keep it up, we are subscribed for daily reading. We like your articles. Best.
Nice artical